मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना; जिल्ह्यातील पहिली रेल्वे जाणार २६ एप्रिलला आयोध्येकडे !

रत्नागिरी : प्रतिनिधी

पालकमंत्री, महसूल राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी देणार उपस्थित राहून यात्रेसाठी शुभेच्छा…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ ८०० नागरिकांना मिळाला असून, २६ एप्रिल रोजी ही रेल्वे प्रभू श्री राम जन्मभूमी असणाऱ्या अयोध्याकडे धावणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर होणाऱ्या प्रमुख सोहळ्यास पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्य मंत्री योगेश कदम, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यात्रेकरुंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केले होते. त्याला जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासाठीची ही पहिली रेल्वे २६ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. २६ एप्रिल रोजी राजापूर रोड येथून सुरु होणाऱ्या या तीर्थ दर्शन यात्रा प्रवासाचा मुख्य सोहळा रत्नागिरी रेल्वे स्थानकावर होणार आहे.

Related Posts

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या मोठ्या दगडावर आदळून उलटली. या थरारक अपघातात…

Read more

देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

देवरुख : प्रतिनिधी सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK)…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!