अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात चिपळूणमध्ये रिपाइंचे तीव्र आंदोलन

चिपळूण: अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चिपळूण तालुक्याच्या वतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर निवेदन देत शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून चिपळूण येथे हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
​यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी आकाश लिगांडे यांना अधिकृत निवेदन सादर केले. त्यानंतर प्रांत कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी “आरक्षण वाचवा”, “उपवर्गीकरण रद्द करा” अशा जोरदार घोषणा देत शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. अनुसूचित जाती आरक्षण हे भारतीय संविधानाने दिलेले घटनात्मक संरक्षण असून, त्याचे उपवर्गीकरण करून आरक्षण कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
​या आंदोलनात रिपाइंचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, कोकण प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. उमेश पवार, युवक जिल्हाध्यक्ष ॲड. प्रशितोष कदम, शहराध्यक्ष मंगेश जाधव, शहर सरचिटणीस अमोल कदम, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष संजय गमरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
​यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते यांनी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कोणत्याही परिस्थितीत टिकले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका व्यक्त केली. आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे दलित समाजात फूट निर्माण होण्याची दाट शक्यता असून शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. हातात निळे झेंडे, निळ्या टोप्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसह कार्यकर्त्यांनी या आंदोलनातून एकजुटीचा संदेश दिला. चोख पोलीस बंदोबस्तात हे आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पडले.

Related Posts

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा…

Read more

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची घोडदौड कायम राखत ३० सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ६००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. ग्राहकांचा दृढ…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

New Hopa Casino account verification guide for UK players

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

PlayGrand UK steps and methods

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

PlayGrand sign in steps and methods – Full UK guide

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

PlayGrand Casino – What UK Players Need to Know

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

PlayGrand Casino Review – Account Verification, Bonuses, Payments & Mobile Guide for UK Players

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views
error: Content is protected !!