‘डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करू नका’; मुंबई उच्च न्यायालयाची एफडीएला फटकार

​मुंबई (प्रतिनिधी):

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आपल्या अधिकारांचा विवेकपूर्ण वापर करावा. ‘डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करण्यासारखी’ कारवाई करू नये, अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एफडीएला पुन्हा एकदा फटकारले. कारवाई करण्यापूर्वी संबंधित पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. कॅडिला फार्मास्युटिकल्सच्या काही औषधांच्या विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याच्या एफडीएच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
​ब्रँडच्या नावांमध्ये साधर्म्य असल्याचा दावा करत एफडीएने कॅडिलाच्या औषधांवर बंदी घालून सुमारे २.४५ कोटी रुपयांचा साठा जप्त केला होता. यावर, कंपनीला आपली बाजू मांडण्याची संधी न देता थेट कठोर कारवाई करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. एफडीएच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयाने सुनावले की, अधिकारांचा वापर विवेकपूर्ण पद्धतीने व्हायला हवा. यानंतर, एफडीएने जारी केलेले आदेश मागे घेऊन कंपनीला नव्याने कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणीची संधी दिली जाईल, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले. या आश्वासनानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली. दरम्यान, एफडीएने राज्यातील १३५ आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांनाही नोटिसा बजावल्या असून १० उत्पादकांचे परवाने रद्द केले आहेत.

Related Posts

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरू असतानाच अचानक भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात…

Read more

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई: ६४६.५८ कोटी रुपयांच्या २११ मालमत्ता जप्त

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात एक मोठी आणि कठोर कारवाई करत ६४६.५८ कोटी रुपयांच्या तब्बल २११ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईअंतर्गत ईडीने महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्ये…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Betti slots registration steps – quick sign‑up guide for UK players

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti UK Security Guide – Licensing, Player Protection & Safe Play

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti withdrawal: what to know

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti Casino UK Review – Bonuses, Payments, Mobile App & Security Overview

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Roletto legit? UK review of licensing, verification, bonuses & payments

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

How to Register on the 1Win Argentina App – Step-by-Step Guide

  • By admin
  • October 4, 2026
  • 3 views
error: Content is protected !!