बीड: मस्साजोगमध्ये राजकीय भूकंप! दिवंगत सरपंचांच्या पत्नीचा पराभव; स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी

बीड: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे. माजी सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या निधनानंतर लागलेल्या या निवडणुकीत मतदारांनी भावनिक लाटेला बाजूला सारत स्वरूपानंद देशमुख यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांच्या फरकाने पराभव केला आहे.

निवडणुकीचा सविस्तर आढावा: मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे हे गाव राज्यभर चर्चेत आले होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी मंगळवारी ८४% विक्रमी मतदान झाले होते. आज सकाळी १० वाजता केज तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली.

एकूण १७४४ वैध मतांपैकी स्वरूपानंद देशमुख यांना ९१४ मते मिळाली, तर अश्विनी देशमुख यांना ८२२ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत संतोष देशमुख यांनी स्वरूपानंद यांचा अवघ्या ९ मतांनी पराभव केला होता, मात्र यावेळी स्वरूपानंद यांनी ९२ मतांनी बाजी मारली.

विजयानंतरची प्रतिक्रिया: विजयी झाल्यानंतर स्वरूपानंद देशमुख म्हणाले की, “कोणी कितीही आरोप केले तरी जनतेने माझ्या कामावर विश्वास दाखवला आहे. ही निवडणूक मी नव्हे, तर गावातील तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आधीही सोबत होतो आणि पुढेही राहीन.”

Related Posts

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पेपरफुटीच्या वादात एमपीएससी (MPSC) सचिव पदमुक्त

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटी आणि अनियमिततेच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक कठोर पाऊल उचलले आहे. सरकारने तात्काळ प्रभावाने एमपीएससीचे सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती…

Read more

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजकीय स्वार्थापोटी मला गोवण्याचा प्रयत्न; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचे सडेतोड प्रत्युत्तर

ठाणे : अशोक घाग प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काडीमात्र संबंध नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ हा निंदनीय प्रकार सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

New Hopa Casino account verification guide for UK players

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand UK steps and methods

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand sign in steps and methods – Full UK guide

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand Casino – What UK Players Need to Know

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

PlayGrand Casino Review – Account Verification, Bonuses, Payments & Mobile Guide for UK Players

  • By admin
  • October 5, 2026
  • 1 views

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views
error: Content is protected !!