मोठी बातमी: फारुख अब्दुल्ला यांच्यावर जम्मूत प्राणघातक हल्ला; भर लग्नमंडपात गोळीबार, थोडक्यात बचावले!

जम्मू: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री जम्मूमधील एका लग्न समारंभात प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असून हल्लेखोराने अगदी जवळून त्यांच्यावर गोळी झाडली, मात्र सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे अब्दुल्ला या हल्ल्यातून सुखरूप बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या ग्रेटर कैलाश परिसरातील ‘रॉयल पार्क’ येथे एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला फारुख अब्दुल्ला यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार नासिर अस्लम वानी हे देखील उपस्थित होते. रात्री जेव्हा अब्दुल्ला सोहळा आटोपून बाहेर पडत होते, तेव्हा गर्दीचा फायदा घेऊन ६३ वर्षीय कमल सिंग जमवाल नावाचा हल्लेखोर त्यांच्या अगदी मागे पोहोचला आणि त्याने आपल्या परवाना असलेल्या पिस्तूलमधून अब्दुल्ला यांच्यावर नेम धरला. हल्लेखोराने ट्रिगर दाबलाच होता, पण त्याच क्षणी त्यांच्यासोबत असलेल्या NSG आणि सुरक्षा पथकाने झडप घालून हल्लेखोराचा हात झटकल्याने गोळी त्यांच्या कानाजवळून निघून गेली आणि मोठा अनर्थ टळला.

सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून प्राथमिक चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. आरोपी कमल सिंग जमवाल हा जम्मूच्या जुनी मंडी परिसरातील रहिवासी असून तो गेल्या २० वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारण्याची संधी शोधत होता आणि हा त्याचा वैयक्तिक अजेंडा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘X’ वर पोस्ट करत संताप व्यक्त केला असून अल्लाहच्या कृपेने वडील वाचले असले तरी झेड प्लस सुरक्षेत इतकी मोठी चूक कशी झाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनीही या घटनेला मोठी सुरक्षा चूक म्हटले असून इतके व्हीव्हीआयपी नेते उपस्थित असताना स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त अपुरा असल्याचा आरोप केला आहे. सध्या जम्मू पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून या हल्ल्यामागे काही संघटनात्मक संबंध आहेत का, याचा तपास यंत्रणा कसून करत आहेत.

Related Posts

Mr Jones online casino – what to know

Mr Jones online casino – Your Practical UK Guide Who runs Mr Jones online casino and is it safe for UK players? Mr Jones online casino is operated by a…

Read more

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

Mr Jones Casino – Practical Guide for UK Players What makes Mr Jones Casino stand out? When you land on the homepage of Mr Jones Casino, the first thing you’ll…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!