जयपूर: नीट (NEET) पेपर लीक, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि देशातील बेरोजगारीच्या विरोधात सोमवारी जयपूर येथील शहीद स्मारक येथे एका भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) चे संस्थापक अभिजित दीपके यांना काही अज्ञात तरुणांनी कथितपणे थापडा मारल्याने घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनासाठी शहीद स्मारक येथे तरुणांची मोठी गर्दी जमा झाली होती. आंदोलन सुरू असताना दीपके यांच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून धरले, त्याच वेळी गर्दीत उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर दीपके यांच्या समर्थकांनी संबंधित तरुणांना पकडून मारहाण केल्याचेही समोर आले असून, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. दीपके यांना मारहाण करणाऱ्यांपैकी एका आरोपीचे नाव राकेश गुर्जर असून तो जयपूरचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, आरोपी राकेश गुर्जर याने आपल्या फेसबुक पेजवर आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असल्याचा दावा केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Mr Jones online casino – what to know
Mr Jones online casino – Your Practical UK Guide Who runs Mr Jones online casino and is it safe for UK players? Mr Jones online casino is operated by a…
Read more
