नागपूर: फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात आलेल्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सिंधी समाजाला हक्काचे घर आणि जमीन मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधी बांधवांना मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात समाजातील ३६ नगरसेवकांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या सिंधी समाजाने अनेक वर्षे शिबिरांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घालवली. मात्र या समाजाने आपल्या दुःखालाच संघर्षाचे शस्त्र बनवले आणि आज हा समाज व्यापार आणि सर्वच क्षेत्रांत आघाडीवर राहून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रदान करण्याचे अभियान राबवले गेले असून, राज्य सरकारने आता या बांधवांना वर्ग-१ च्या जमिनींचे शंभर टक्के मालकी हक्क देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी अत्यंत वेगाने केली जाईल. कार्यक्रमात ३५० पैकी १२ लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगर येथील सिंधी बांधवांसाठी जमिनींचे नियमितीकरण करण्याबाबत वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे महत्त्वाचे आश्वासन दिले. या सोहळ्याला भगवानदास सवनानी, आमदार कुमार आयलानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय संरक्षक घनश्याम कुकरेजा, सिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनकी रूघवानी, संयोजक वीरेंद्र कुकरेजा आणि सचिव पी.टी. दारा यांसह समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

नागपूर: फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात आलेल्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सिंधी समाजाला हक्काचे घर आणि जमीन मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधी बांधवांना मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात समाजातील ३६ नगरसेवकांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या सिंधी समाजाने अनेक वर्षे शिबिरांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घालवली. मात्र या समाजाने आपल्या दुःखालाच संघर्षाचे शस्त्र बनवले आणि आज हा समाज व्यापार आणि सर्वच क्षेत्रांत आघाडीवर राहून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रदान करण्याचे अभियान राबवले गेले असून, राज्य सरकारने आता या बांधवांना वर्ग-१ च्या जमिनींचे शंभर टक्के मालकी हक्क देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी अत्यंत वेगाने केली जाईल.

कार्यक्रमात ३५० पैकी १२ लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगर येथील सिंधी बांधवांसाठी जमिनींचे नियमितीकरण करण्याबाबत वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे महत्त्वाचे आश्वासन दिले. या सोहळ्याला भगवानदास सवनानी, आमदार कुमार आयलानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय संरक्षक घनश्याम कुकरेजा, सिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनकी रूघवानी, संयोजक वीरेंद्र कुकरेजा आणि सचिव पी.टी. दारा यांसह समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

नाशिक : वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि ‘प्रति पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.…

Read more

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सोलापूर: सत्ताधाऱ्यांच्या टीकेला अत्यंत आक्रमक आणि ‘जशास तसे’ उत्तर देणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शरद कोळी यांच्यावर…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Tremendous_challenge_awaits_in_the_chicken_road_as_traffic_intensifies_with_each

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Wettstrategien_entwickeln_und_mit_bets24_im_Sport_erfolgreich_sein

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Strategies_exploring_pay_by_mobile_options_for_enhanced_customer_journeys

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Unkomplizierte_Unterhaltung_bietet_das_chicken_road_casino_mit_cleveren_Strategi

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

BuyScenicSD.com Overview and Options

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Télécharger 1xbet pour Android – dernière version française : ce qu’il faut savoir

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views
error: Content is protected !!