उद्या होणारी शिक्षक शिक्षकेतरांची समायोजन प्रक्रिया रद्द ! नवी तारीख लवकरच जाहीर होणार..

रत्नागिरी : दादा जाधव

जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल २६३ अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सायंकाळी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.

यासंदर्भात अधिक वृत्त असे की, गुरुवार दि.१६ एप्रिल रोजी समायोजन प्रक्रिया शिर्के प्रशाला येथे राबविण्यात येणार होती. सदर प्रक्रियेकडे तसेच होणाऱ्या निर्णयाकडे जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्या दरम्यान समायोजन प्रक्रीया रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याने जिल्ह्यात विविधांगी चर्चा घडू लागली आहे. अतिरिक्त ठरलेल्या सदर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यामुळे घालमेल वाढली आहे.

माध्यमिक शिक्षण विभागाने यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण केली असताना हरकतींवरील सुनावणी देखील पूर्ण झाली आहे. मात्र पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे सदरचा समायोजन कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पटसंख्ये-अभावी अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यामध्ये अतिरिक्त ठरलेले शिक्षक २६३ असून अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी संख्या १५० इतकी आहे. माध्यमिक खासगी शाळा (रिक्त पदे) ३६९ इतकी आहे. विनाअनुदानित शाळा (रिक्त पदे) २१४ असून एकूण रिक्त पदे ३१५ समायोजन प्रक्रियेचा मोठा फटका जिल्ह्यातील काही शाळांना बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ९९ शाळा शून्य शिक्षकी होणार आहेत. खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचा यात समावेश आहे. समायोजन प्रक्रियेपूर्वी जिल्हाभरातून एकूण २९ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी काही हरकतींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. तर उर्वरित १३ हरकतींवर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात सुनावणी घेण्यात आली असल्याचे समजते.

Related Posts

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान

खेड : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान आणि स्वच्छता हीच सेवा-२०२६’ या उपक्रमांतर्गत खेड रेल्वे स्थानक परिसरात भाजपच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.…

Read more

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!

​रत्नागिरी : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी मोरे हिने शास्त्रीय गायन स्पर्धेत उत्कृष्ट…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Tremendous_challenge_awaits_in_the_chicken_road_as_traffic_intensifies_with_each

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Wettstrategien_entwickeln_und_mit_bets24_im_Sport_erfolgreich_sein

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Strategies_exploring_pay_by_mobile_options_for_enhanced_customer_journeys

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Unkomplizierte_Unterhaltung_bietet_das_chicken_road_casino_mit_cleveren_Strategi

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

BuyScenicSD.com Overview and Options

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Télécharger 1xbet pour Android – dernière version française : ce qu’il faut savoir

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views
error: Content is protected !!