लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीविरोधात लोटे परशुराममध्ये जनक्षोभ! पीफास (PFAS) उत्पादनावरून ग्रामस्थांचा एल्गार; मुख्यमंत्री, मंत्र्यांवर कडाडून टीका

चिपळूण तालुक्यातील लोटे परशुराम येथील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीविरोधात गेल्या ७६ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाने आता उग्र रूप धारण केले आहे. पीफास (PFAS) या घातक रसायनाच्या उत्पादनामुळे कोकणच्या पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाल्याचा आरोप करत हजारो ग्रामस्थांनी कंपनीवर धडक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर कडाडून टीका करत, जोपर्यंत हे उत्पादन कायमस्वरूपी बंद होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. या जनक्षोभामुळे लोटे एमआयडीसी परिसरातील वातावरण सध्या चांगलेच तापले असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Read more

error: Content is protected !!