रत्नागिरी: स्वसंरक्षण प्रशिक्षण मुलींचा आत्मविश्वास वाढवणारे; महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे प्रतिपादन

रत्नागिरीतील शिरगाव येथील महर्षी कर्वे महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त ‘ईगल तायक्वांदो’च्या सहकार्याने विद्यार्थिनींसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षिका संकेता सावंत यांनी संकटाच्या वेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणत्या युक्त्या वापराव्यात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना दिले. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यावेळी केले.

Read more

error: Content is protected !!