आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही; अमेरिका-इराण शांतता करारावर इस्रायलची तीव्र प्रतिक्रिया

अमेरिका आणि इराण दरम्यान होणाऱ्या आगामी शांतता करारावर इस्रायलने अत्यंत तीव्र आक्षेप घेतला आहे. “आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही,” अशा कडक शब्दांत इस्रायलचे गृहमंत्री इतामार बेन ग्वीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा करार फेटाळून लावला असून, इस्रायल आपल्या सुरक्षेचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read more

राज्यसभा निवडणूक: सुप्रीम कोर्टाकडून मीनाक्षी नटराजन यांची याचिका फेटाळली; काँग्रेसला मोठा झटका

निवडणूक प्रक्रियेत न्यायालय थेट हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांची राज्यसभा निवडणुकीशी संबंधित याचिका फेटाळली आहे. या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून कार्यकर्त्यांनी दिल्लीत जंतर-मंतरवर जोरदार निदर्शने केली आहेत.

Read more

अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर पहाटे पोलिसांचा छापा, ४ तासांच्या झडतीने बंगालमध्ये राजकीय भूकंप

टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील निवासस्थानी पोलिसांनी पहाटे ३ वाजता अचानक छापा टाकत ४ तास झाडाझडती घेतली. विविध घोटाळ्यांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या बॅनर्जी यांच्यावरील या कारवाईमुळे पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसी आणि भाजपमध्ये मोठा राजकीय वाद पेटला आहे.

Read more

कोलकाता आग: ४००० EVM जळून खाक; घातपाताच्या संशयावरून राजकीय वाद पेटला

कोलकात्याच्या सरकारी इमारतीत लागलेल्या भीषण आगीत विधानसभा निवडणुकीत वापरलेली सुमारे ४,००० ईव्हीएम यंत्रे जळून खाक झाली आहेत. आग लागण्याच्या विचित्र पद्धतीमुळे मंत्र्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, यावरून आता पश्चिम बंगालमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

Read more

Comprendre les cookies et traceurs sur votre site web

Pour assurer une expérience utilisateur optimale, il est crucial de prêter attention à l’utilisation des dispositifs de suivi. Ces éléments permettent non seulement de personnaliser les interactions, mais aussi d’analyser…

Read more

गृहिणी नव्हे ‘राष्ट्रनिर्माती’! रस्ते अपघातातील भरपाईसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; मासिक उत्पन्न ३० हजार रुपये गृहीत धरण्याचे आदेश

गृहिणी केवळ घरकाम करणारी नसून ‘राष्ट्रनिर्माती’ आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघातात मृत पावलेल्या गृहिणीच्या कुटुंबाला न्याय देणारा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मोटर अपघात भरपाईच्या दाव्यांमध्ये गृहिणीचे अंदाजित मासिक उत्पन्न किमान ३० हजार रुपये गृहीत धरण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, महागाईनुसार त्यात दर तीन वर्षांनी १० टक्के चक्रवाढ वाढ केली जाईल. तसेच, अपघाताचे असे दावे एका वर्षाच्या आत निकाली काढण्याचे निर्देशही न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयांना दिले आहेत.

Read more

विरोधी पक्षांना फोडून भाजप देशात लोकशाहीचा गळा घोटतोय; आप नेते संजय सिंह यांचा घणाघाती आरोप

तृणमूल काँग्रेसमधील संभाव्य फुटीच्या चर्चांवरून ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर ‘लोकशाहीचा गळा घोटल्याचा’ तीव्र आरोप केला आहे. विरोधी पक्ष फोडण्याच्या भाजपच्या रणनीतीवर टीका करताना, “आता भाजपमध्ये जाण्यासाठी फक्त दाऊद इब्राहिमच उरला आहे,” असा टोला त्यांनी लगावला असून, जनतेने आवाज उठवला नाही तर भविष्यात निवडणुकांना काहीच अर्थ उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Read more

विकसित महाराष्ट्र २०४७: नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला राज्याचा प्रगतीचा विस्तृत रोड मॅप

नवी दिल्लीतील नीती आयोगाच्या ११ व्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ चा सर्वसमावेशक रोड मॅप सादर केला. देशाच्या जीडीपीमध्ये १४% योगदान देणाऱ्या महाराष्ट्राला २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट असून, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि महिला सक्षमीकरणाच्या जोरावर राज्य शाश्वत विकासाकडे वाटचाल करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read more

आखाती देशांतील जहाजांवर अमेरिकन हल्ले; ३ भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताकडून अमेरिकेचा तीव्र निषेध

आखाती क्षेत्रात व्यापारी जहाजांवर झालेल्या अमेरिकन लष्कराच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ३ भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला असून, अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाचारण करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हे हल्ले तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.

Read more

‘चीफ’ नाही, ‘चीप’ मिनिस्टर; लालू-राबडी देवींच्या सुरक्षेत कपातीवरून तेजस्वी यादव सम्राट चौधरींवर भडकले

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या सुरक्षेत झालेल्या कपातीवरून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर ‘चीप मिनिस्टर’ म्हणत घणाघाती टीका केली असून, एनडीए सरकार सूडबुद्धीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

Read more

error: Content is protected !!