रत्नागिरी: मुसळधार पावसामुळे कोंडये-वगडे फाट्याजवळ मुख्य रस्त्यावर झाड कोसळले; वाहतूक ठप्प

संगमेश्वर : प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फुणगूस-जाकादेवी मुख्य रस्त्यावरून कोंडये गावाकडे जाणाऱ्या मार्गावर, वगडे फाट्याच्या पुढे एक महाकाय झाड रस्त्यावरच कोसळल्याची घटना घडली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हे झाड उन्मळून पडल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांसह वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत.कोंडये-वगडे फाट्यापुढील हा मार्ग कोंडये मधलीवाडी, दसमवाडी, बौद्धवाडी, वरचा व खालचा मळा, देसाईवाडी तसेच डावखोल, कळकदे आणि कोंडकडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सोयीचा रस्ता आहे. यामुळे या मार्गावर नेहमीच एसटी बसेस आणि खासगी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, झाड कोसळल्याने हा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद झाला.वाहतूक खोळंबल्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बस सोयने फाट्यावरून वळवण्यात आली, तर इतर खासगी वाहने सुवरेवाडी अंतर्गत ग्रामीण रस्त्यावरून मार्ग काढत आहेत. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हा वृक्ष रस्त्यावरून हटवावा आणि वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून केली जात आहे.

Related Posts

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान

खेड : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान आणि स्वच्छता हीच सेवा-२०२६’ या उपक्रमांतर्गत खेड रेल्वे स्थानक परिसरात भाजपच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.…

Read more

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!

​रत्नागिरी : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी मोरे हिने शास्त्रीय गायन स्पर्धेत उत्कृष्ट…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Tremendous_challenge_awaits_in_the_chicken_road_as_traffic_intensifies_with_each

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Wettstrategien_entwickeln_und_mit_bets24_im_Sport_erfolgreich_sein

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Strategies_exploring_pay_by_mobile_options_for_enhanced_customer_journeys

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Unkomplizierte_Unterhaltung_bietet_das_chicken_road_casino_mit_cleveren_Strategi

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

BuyScenicSD.com Overview and Options

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views

Télécharger 1xbet pour Android – dernière version française : ce qu’il faut savoir

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views
error: Content is protected !!