“तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात, पण तुमचे अधिकारी दरोडेखोर!”; संजय राऊतांचे तुकाराम मुंढेंना पत्र

मुंबई :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक सविस्तर पत्र लिहिले आहे. या पत्रात राऊत यांनी भेसळ आणि अस्वच्छतेविरुद्ध मुंढे यांनी सुरू केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र, याच कारवाईचा गैरफायदा घेत एफडीएचे अधिकारी हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट आणि क्विक कॉमर्स कंपन्यांना परवाना निलंबनाची धमकी देऊन उघडपणे खंडणी वसूल करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
राऊत यांनी आपल्या पत्रात वसुलीच्या दरांवर थेट बोट ठेवले आहे. ते म्हणाले, “तुकाराम मुंढे हे एफडीए आयुक्त होण्यापूर्वी ‘क्लोजिंग नोटीस’चा (Closing Notice) दर १०-१२ हजार रुपये होता. मात्र, मुंढेंनी दहशत निर्माण केल्यावर हाच वसुलीचा दर आता ७५ हजार ते २ लाखांवर गेला आहे.” वांद्रे मुख्यालय आणि ठाणे कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर या लुटीचा मुख्य अड्डा असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. नागपूर, पुणे, सोलापूर, वर्धा आणि छत्रपती संभाजीनगरमधील अनेक त्रस्त व्यावसायिकांनी भेटून या लुटीच्या कथा सांगितल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
एफडीएचे सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकारी कायद्यातील ‘नोटीस आणि सुनावणी’ या प्रक्रियेला बगल देऊन थेट परवाना निलंबनाची भीती दाखवत आहेत, असे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. समाजमाध्यमांवरील बनावट तक्रारींवरून किंवा केवळ उंदीर, झुरळ दिसल्याच्या नावाखाली थेट कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे, ठाण्यातील एका अधिकारी जोडीने एका क्विक कॉमर्स कंपनीकडून परवाना परत मिळवण्यासाठी तब्बल १७ ते १८ लाख रुपये उकळल्याचा अत्यंत गंभीर आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.
एकीकडे विखुरलेल्या आणि छोट्या खाद्य व्यावसायिकांवर थेट कारवाईचा बडगा उगारला जातो, तर दुसरीकडे फार्मा क्षेत्रातील (औषध निर्माण) बड्या कंपन्यांच्या गंभीर चुकांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. फार्मा लॉबी मजबूत असून ते सत्ताधाऱ्यांना कोट्यवधींच्या देणग्या देत असल्याने त्यांना अभय मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणात राऊत यांनी मुंढे यांच्याकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. वांद्रे आणि ठाण्यातील ‘क्लोजिंग नोटीस रेटकार्ड’ची तातडीने चौकशी करावी, ग्राहकांच्या तक्रारींची स्वतंत्र शहानिशा करावी, कायदेशीर प्रक्रियेला बगल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, ठाण्यातील १७-१८ लाखांच्या वसुलीची स्वतंत्र चौकशी करावी आणि परवाना निलंबनाची सर्व माहिती सार्वजनिक करावी, अशी आग्रही मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Related Posts

ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’ आता मेट्रो सिनेमा ते बीएमसीपर्यंत

मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात उद्धव आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत विशाल ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष विनंतीवरून सुरक्षिततेच्या कारणास्तव या सर्वपक्षीय…

Read more

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरू असतानाच अचानक भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Barz slots registration steps: Quick sign‑up guide for UK players at Barz Casino

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

Barz online casino bonus guide – UK welcome offers, wagering requirements & ongoing promos

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

Barz promo code steps and methods: UK guide to claiming your bonus

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

Voodoo Casino bonus guide: UK welcome offer breakdown

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

Betti Casino mobile guide for UK players – app download, bonuses & payments

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

Betti slots registration steps – quick sign‑up guide for UK players

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views
error: Content is protected !!